दि.२१(पीसीबी)- लिंगपिसाट खरातला 35 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार आणि तिला ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी बुधवारी अटक केली. खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले असून 100 हून अधिक व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश एसआयटीला देण्यात आले होते.
अशोख खरात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या मिरगाव येथील श्री ईश्वरेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तिथे त्याचे एक आलिशान फार्महाऊस आहे, जिथे अनेक प्रभावशाली लोकांची वर्दळ असते. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात “ओकास प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स” नावाचे कार्यालय चालवत होता. त्याचे राजकीय संबंध दिल्लीपासून महाराष्ट्रातील सत्ताधारी वर्गापर्यंत पसरलेले असल्याचे म्हटले जाते. खरातचे अनेक प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि नामांकित व्यक्तींशी संबंध आहेत. या अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या माध्यमातून त्याने विविध ठिकाणी जमीन खरेदी, गुंतवणूक आणि बांधकाम व्यवसायात मोठा सहभाग घेतल्याचे समोर येत आहे.
200 कोटी रुपयांची अफाट मालमत्ता
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात अशोक खरातने गेल्या 15 वर्षांत तब्बल 200 कोटी रुपयांची अफाट मालमत्ता (संपत्ती) जमा केली आहे
कोट्यवधींच्या जमिनी आणि प्लॉट
नाशिकमधील पाथर्डी परिसरात त्याच्या मालकीची सुमारे 30 एकर जमीन असून, तिची बाजारातील किंमत अंदाजे 150 कोटी रुपये आहे
इतर जमिनी: याशिवाय कहांडळवाडी आणि मिरगाव भागात त्याची जवळपास ४५ एकर जमीन आहे
पाथर्डी आणि गौळाणे शिवारात त्याने कुटुंबीयांच्या नावावरही जमिनी घेतल्या आहेत
ओझर विमानतळाजवळ आणि इतर अनेक भागांमध्येही त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी असल्याचा पोलिसांना संशय आहे
आलिशान बंगले, फार्महाऊस, कार्यालय
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे एका मंदिराच्या मागे त्याचे एक भव्य फार्महाऊस आहे, ज्याची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते
बंगला आणि कार्यालय: नाशिकच्या कर्मवीर नगरमध्ये त्याचा एक आलिशान बंगला आहे
तसेच, ‘कॅनडा कॉर्नर’ या उच्चभ्रू परिसरात त्याचे एक कार्यालय असून त्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे
खरात हा मिरगाव येथील ‘श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’चा अध्यक्ष आहे
या ट्रस्टची वार्षिक उलाढाल सुमारे 2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते
त्याने ‘शिवनिका ट्रस्ट’च्या माध्यमातून मिरगाव येथील मंदिराची जबाबदारी घेतली आणि आपल्या प्रभावाचा वापर करून स्वतःचे आर्थिक व सामाजिक जाळे मजबूत केले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी खरातच्या संपत्तीवर मोठे आरोप केले आहेत. त्यांच्या मते, खरातची प्रॉपर्टी फक्त पाथर्डी किंवा अहिल्यानगरपुरती मर्यादित नसून देश-विदेशातही त्याची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे. या अफाट ‘बेनामी संपत्ती’चे स्रोत नेमके काय आहेत, याची सखोल चौकशी ‘आर्थिक गुन्हे शाखा’ (EOW) आणि ‘ईडी’ने (ED) करावी अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ (SIT) नेमली असून, गुन्हे शाखेने खरातच्या मिरगाव येथील फार्महाऊसवर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांना त्याच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. तसेच तिथे एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.








































