…अशा राजकारणाची लाज वाटत नाही पंतप्रधान ? – राहुल गांधी

0
403

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) : काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करतात. आज राहुल यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर हल्लाबोल करताना देशात करण्यात येत असलेल्या राजकारणावरून टीका केली. यावेळी राहुल गांधी यांनी बिलकीस बानो प्रकरणातील आरोपांच्या सुटकेवरून भाजपवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. तसेच सरकारवर गंभीर आरोप केले. राहुल गांधींनी ट्विट करून म्हटलं की, की उन्नाव – भाजप आमदाराला वाचवण्यासाठी काम करा, कठुआ – बलात्कार्‍यांच्या समर्थनार्थ रॅली, हाथरस – सरकार बलात्काऱ्यांच्या बाजूने आणि आता गुजरात – बलात्कार्‍यांची सुटका आणि सन्मान! गुन्हेगारांना पाठिशी घालणे हे भाजपची महिलांप्रती असलेली क्षुद्र मानसिकता दर्शवते. अशा राजकारणाची लाज वाटत नाही पंतप्रधान? असा सवाल राहुल गांधी यांन केला.

बिलकीस बानो प्रकरणात राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काल एक ट्विट देखील केले होते, ज्यामध्ये असे लिहिले होते की ज्यांनी 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीची हत्या केली, त्या आरोपांनी सातंत्र्यांच्या अमृत महोत्सवादरम्यान मुक्त करण्यात आलं. स्त्रीशक्तीच्या गप्पा मारणारे लोक देशातील महिलांना काय संदेश देत आहेत? पंतप्रधान, तुमच्या बोलण्यातील आणि वागण्यातील फरक संपूर्ण देशाला दिसत आहे, असंही राहुल यांनी म्हटलं होतं.

गुजरात सरकारने बिलकीस बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना माफीच्या धोरणांतर्गत सोडण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिलकीस बानोवर सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याची शिक्षा नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही कायम ठेवली होती.