अवैधपणे वृक्ष तोड करणा-या कंपनीला महापालिकेचा दणका, 45 लाखाच्या दंडाची नोटीस

0
277

पिंपरी दि. १४ (पीसीबी) – आकुर्डी येथील मे. फॉरमायका कंपनीने वेगवेगळ्या प्रजातीचे 90 वृक्ष अनधिकृतपणे काढलेली आ हेत. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने फॉरमायका कंपनीला नोटीस दिली आहे. एका वृक्षाकरिता 50 हजार रुपयांप्रमाणे 90 वृक्षांची दंडापोटी 45 लाख रुपयांची नोटीस कंपनीला बजाविली आहे. कंपनीचा खुलासा प्रात्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका उद्यान विभागाने सांगितले.

पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अमलात आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षांचा विस्तार कमी करणे, वृक्षतोड करणे, वृक्ष पुनर्रोपन करणे पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, आकुर्डीतील मे फॉरमायका कंपनीने अनधिकृतपणे वृक्ष काढलेली आहेत. या जागेवर वृक्ष गणनेच्या माहितीच्या आधारे असलेले वेगवेगळया प्रजातीचे एकूण 90 वृक्ष जे. सी. बी च्या सहाय्याने वृक्ष काढल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे.

विनापरवाना वृक्ष काढल्यामुळे प्रत्येकी एका वृक्षाकरीता 50 हजार रूपये प्रमाणे एकूण 90 वृक्षासाठी 45 लाख रूपयांचा दंडाची नोटीस महापालिकेने फॉरमायका कंपनीला पाठविली आबे. कंपनीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.