अवजड वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

0
50

दि. २१ (पीसीबी) – पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने वडगाव फाटा एमआयडीसी रोड मार्गे वडगाव कमान (डावीकडे वळून) तळेगाव नवलाख उंब्रे बधलवाडी भामचंद्र डोंगर आंबेठाण एचपी चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील.

मुंबईकडून चाकणच्या दिशेने जाणा-या हलक्या वाहनांना व दुचाकीस वडगाव फाटा ते इंद्रायणी कॉलेज पर्यंतचे मार्गावर बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने वडगाव फाटा निलया सोसायटी कार्नर (डावी कडे वळून) मंत्रा सिटी रोड मार्गे बीएसएनएल कॉर्नर (उजवीकडे वळून) सीटी कार्नर (डावीकडे वळून) हिंदमाता भुयारी मार्ग येथे उजवीकडे वळून चाकण बाजुकडे जातील. काका हलवाई स्वीट मार्ट / शांताई जनसेवा वाचनालय इंद्रायणी कॉलेज

चाकण एचपी चौकाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जड व अवजड वाहतुकीस चाकण तळेगाव रोडवर बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने एचपी चौक आंबेठाण भामचंद्र डोंगर नवलाख उंब्रे तळेगाव एमआयडीसी मार्गे इच्छीत स्थळी जातील.

बधलवाडी चाकण कडून मुंबईच्या दिशेने जाणा-या हलक्या वाहनांना व दुचाकींना इंद्रायणी कॉलेज तळेगाव ते वडगाव फाटया पर्यंतच्या रोडवर बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने जनसेवा वाचनालय इंद्रायणी कॉलेज येथे (डावीकडे वळून) हिंदमाता भुयारी मार्ग शांताई सीटी कार्नर (उजवीकडे वळून) बीएसएनएल कॉर्नर (डावीकडे वळून) मंत्रासिटी रोड मार्गे इच्छीत स्थळी जातील.

महायुतीच्या कार्यकर्त्यांना येथे पार्किंग

मतमोजणीच्या दिवशी महायुतीचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांना वडगाव फाटा ते स्वराज नगरी मार्गे येवून माउंट सेंट अॅन स्कुल तळेगाव चाकण रोड तळेगाव या शाळेच्या पार्कीगमध्ये थांबण्याची व मैदानामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

बापूसाहेब भेगडे यांच्या कार्यकर्त्यांसाठी येथे पार्किंग

मतमोजणीच्या दिवशी अपक्ष उमेदवार बापुसाहेब जयवंतराव भेगडे व त्यांचे कार्यकर्ते तळेगाव स्टेशन चौकातून हरणेश्वर सोसायटी मार्गे येवून वाघळे पार्क, हरणेश्वर सोसायटी, येथील अंतर्गत रोड लगत तसेच भारत पेट्रोल पंप ते ईगल कार्नर पर्यंत सर्व्हिस रोडवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यकर्त्यांना थांबण्याकरीता नुतन पॉलेटेक्निल कॉलेजच्या कमानीचे उजव्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे.

इतर अपक्ष उमेदवारांसाठी येथे पार्किंग

इतर अपक्ष उमेदवार यांच्या कार्यकर्त्याकरीता दुय्यम निबंधक कार्यालया समोरील अंतर्गत रोड लगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालया जवळील मोकळ्या जागेत व्यवस्था करण्यात आली आहे