अल्पवयीन स्वयंघोषित भाईची चाकण मध्ये दहशत

0
448

अल्पवयीन मुलाने कोयता घेऊन एका दुकानदाराला धमकावत त्याच्या दुकानातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी एक वाजता महात्मा फुले चौक, चाकण येथे घडली.

फैसल अकरम अन्सारी (वय 22, रा. खंडोबा माळ, चाकण) यांनी याप्रकरणी 17 वर्षीय मुलाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलाने अन्सारी यांना कोयता दाखवून एक हजार रुपये मागितले. अन्सारी यांनी पैसे दिले नाहीत म्हणून तो दुकानाच्या आतमध्ये आला. त्याने जबरस्तीने दुकानच्या ड्रावर मधून एक हजार रुपये काढून घेतले. मी इथला भाई आहे, माझे कोणी काही करू शकत नाही, असा दम देत तो कोयता फिरवत निघून गेला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.