अल्पवयीन मुलीसोबत लग्न आणि लैंगिक अत्याचार

0
305

चाकण, दि. १२ (पीसीबी) –   अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गरोदर राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला असता जन्मताच त्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीडित मुलीचा पती आणि सासरा या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ८ एप्रिल २०२३ या कालावधीत राक्षेवाडी चाकण येथे घडला.

केशव रघुनाथ काळे (वय २१, रा. चाकण), सासरे रघुनाथ लक्ष्मण पवार (वय ४५, रा. चाकण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चाकण पोलिसांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही आरोपीची नातेवाईक आहे. ती १७ वर्षांची आहे. हे माहिती असताना देखील आरोपीने व त्याच्या वडिलांनी पीडितेचा बालविवाह केला. पुढे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केले. प्रसुतीसाठी तिला पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता तिचा गर्भ मृत्यू पावला. प्रसुतीवेळी मुलीचे वय उघडकीस आल्याने आरोपींना पोलिसांनी अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.