अल्पवयीन मुलीसह तिच्या आईशी गैरवर्तन; आरोपी अटकेत

0
331

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – महिलेशी ओळखीचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले, पुढे तिच्याच 17 वर्षीय मुलीशी गैरवर्तन करत मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दबाव अनणाऱ्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरु होता.

याप्रकरणी 40 वर्षीय पीडितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सद्दाम उर्फ उजाला जमसेद (वय 35 रा.पिंपरी गाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला सांगितले तर पीडितेच्या मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच पीडतेच्या 17 वर्षीय मुलीशी गैरवर्तन करत तिच्याशी लग्न लावून देण्याबाबत दबाव आणला. लग्न नाही लावले तर पीडितेचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मुलीसोबतचे फोटो व अश्लील कॉल रेकॉर्डींग व्हायरल केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.