अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0
335

वाकड, दि. ११ (पीसीबी) – काळा खडक वाकड येथील एका लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सात ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत पीडित मुलीच्या 38 वर्षीय वडिलांनी सोमवारी (दि. 10) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 17 वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 16 वर्षीय मुलीला अल्पवयीन मुलाने काळाखडक येथील लॉजवर नेऊन तिच्याशी लगट करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.