अल्पवयीन मुलीवर नात्यातील तरुणाकडून लैंगिक अत्याचार

0
764

मावळ, दि. १८ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीवर नात्यातील तरुणाने लैंगिक अत्याचार केला. मुलगी साडेतीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार मार्च, एप्रिल २०२२ मध्ये मावळ तालुक्यात घडला.

पीडित अल्पवयीन मुलीने याप्रकरणी गुरुवारी (दि. १६) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या नात्यातील १९ वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या चुलत भावाच्या घरी भावाच्या मुलांना खेळण्यासाठी बोलवायला गेली असता आरोपीने पीडित मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणास न सांगण्याची धमकी दिली. या घटनेला साडेतीन महिने उलटून गेले. गुरुवारी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती साडेतीन महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आले. त्यांनतर मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण तपास करीत आहेत.