देहूरोड, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) – एका व्यक्तीने बारा वर्षीय मुली सोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 9) सायंकाळी 5 ते 7 वाजताच्या कालावधीत गुरु आशिष कोचिंग क्लासेस, देऊगाव येथे घडली.
विजय कृष्णा अंदुर्लेकर (वय 32, रा. माळवाडी प्राधिकरण, देहुगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी 36 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु आशिष कोचिंग क्लासेस देहूगाव येथे ऑफिसमध्ये असताना आरोपीने फिर्यादी यांच्या बारा वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.










































