अल्पवयीन मुलीचा विनयभंग एकास अटक

0
430

निगडी, दि.२९ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी मेसेजवर बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना ऑक्टोबर 2021 ते 28 मार्च 2023 या कालावधीत निगडी परिसरात घडली.

सतीश मोहनभाई मिस्त्री (वय 28, रा. ठाणे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत 17 वर्षीय मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना आरोपीने तिच्याशी सोशल मिडियावरून ओळख केली. फिर्यादीला समक्ष भेटायला बोलावण्यासाठी वेळोवेळी मेसेज केले. फिर्यादीची इच्छा नसताना तिचा पाठलाग करून गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.