अल्पवयीन मुलाकडून 9 किलो गांजा जप्त

0
84

महाळुंगे, दि. 19 (प्रतिनिधी)

गुन्हे शाखा युनिट तीनने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नऊ किलो 860 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 18) रात्री करण्यात आली.

पोलीस अंमलदार राहुल सूर्यवंशी यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाळुंगे इंगळे येथील एका कंपनीजवळ एक मुलगा गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार लाख 93 हजार रुपये किमतीचा 9 किलो 860 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.