अल्पवयीन मुलाकडून मारहाण

0
26

वाकड, दि. 31 (पीसीबी)
अल्पवयीन मुलगा त्याच्या आई आणि भावाला मारहाण करत होता. त्याला अडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला आणि तरुणाच्या कुटुंबियांना मुलाने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ३०) पहाटे थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी मीराबाई राजेंद्र बोरसे (वय ५५, रा. वडगाव मावळ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १६ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा संजय हा थेरगाव येथे राहतो. त्यांच्या शेजारी राहणारा अल्पवयीन मुलगा त्याच्या आई आणि भावाला मारहाण करत होता. त्यामुळे संजय हे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी अल्पवयीन मुलाने संजय यांना शिवीगाळ करत घरावर लाथा मारून दहशत निर्माण केली. त्यानंतर घरमालकाच्या बहिणीला मारून जखमी केले. फिर्यादी यांना देखील मारहाण करून जखमी केले. फिर्यादी यांच्या सुनेला देखील मारहाण केली. त्यानंतर मुलगा त्याच्या मित्राच्या दुचाकीवर बसून पळून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.