अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त

0
14

भोसरी, दि .7 (पीसीबी)
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी, औद्योगिक तक्रार निवारण विभागाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ६) सायंकाळी संतनगर, मोशी येथे करण्यात आली.

संतनगर, मोशी येथे एक अल्पवयीन मुलगा पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याने हे पिस्तूल दीपक वाघमारे याच्याकडून आणले होते. त्यामुळे दीपक वाघमारे याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप गंगावणे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.