अल्पवयीन मुलाकडून पिस्तुल जप्त

0
102

दि. ३१ जुलै (पीसीबी) चाकण,
पिस्तुल बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (दि. 30) रात्री साडेआठ वाजता आळंदी-चाकण रोडवर कुरुळी येथे करण्यात आली.

पोलीस अंमलदार रणधीर माने यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी-चाकण रोडवर कुरुळी येथे एक अल्पवयीन मुलगा पिस्तुल घेऊन आला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.