अल्पवयीन पत्नीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

0
230

दिघी, दि. २५ (पीसीबी) – अल्पवयीन पत्नीवर पतीने लैंगिक अत्याचार केला. त्यामध्ये पत्नी गरोदर राहिली. हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते 3 मार्च 2023 या कालावधीत दिघी येथे घडला.

सहायक पोलीस निरीक्षक मंगल जोगन यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 26 वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथी वायसीएम हॉस्पिटलमध्ये एक अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचा प्रकार उघडकीस आला. ती विवाहित असून तिची कोणाविरोधात तक्रार नसल्याचे अल्पवयीन विवाहितेने सांगितले. तरीही दिघी पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला. अल्पवयीन विवाहितेच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली आहे. याबाबत लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.