अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्ट्मध्ये फेरफार केल्याने डॉ. अजय तावरेंना बेड्या

0
130

पुणे, दि. २७ (पीसीबी) – ससून हॉस्पिटलचे भ्रष्ट प्रशासन सुधारण्याचे नाव घेत नाही. ड्रग केसमध्ये ससून अधिष्टातासह रथी महारथींनी हे सरकारी रुग्णालय बदनाम केले. आता पुणे हिट अँड रन प्रकरणातही कहर केला. ज्यांच्या भरवशावर संपूर्ण खटला न्यायालयात सिध्द होऊ शकतो त्या यंत्रणेतील एक कडी म्हणजे डॉक्टरांंनी पैशासाठी स्वतःला विकल्याचे समोर आले आहे.

हिट अँड रन प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडून नियमबाह्य सर्व गोष्टी केल्या जात आहेत. वाट्टेल त्या थराला जाऊन आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन आरोपीचा गुन्हा आपल्या डोक्यावर घ्यावा, म्हणून ड्रायव्हरला आमिष दाखवलं, त्याला डांबून ठेवल्याच समोर आलं. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. आता अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्ट्मध्ये फेरफार केल्याच समोर आलय. या प्रकरणी डॉ. अजय तावरे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ही अटक झाली आहे. डॉ. अजय तावरे हे सध्या ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबचे HOD आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

घटनेच्यावेळी अल्पवयीन आरोपी त्याची आलिशान पोर्शे कार चालवत होता. त्याने पुण्याच्या कल्याणीनगर भागातील अरुंद रस्त्यावर भरधाव वेगात पोर्शे चालवून दुचाकीवर बसलेल्या दोघांना उडवलं. यात तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. हा गुन्हा करण्याआधी आरोपी दारु प्याला होता. तो दोन पबमध्ये गेला होता. एका पबमध्ये त्याने 48 हजार रुपये उडवले. त्यात दारुच बिल सुद्धा होतं. ते बिल सुद्धा पोलिसांकडे आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दारु पार्टी करताना दिसला आहे. त्यामुळे त्याचा ब्लड रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. पोलिसांनी अजून त्याचा ब्लड रिपोर्ट काय आहे? त्याची माहिती दिलेली नाही. ब्लड रिपोर्टमधून आरोपीने त्यावेळी मद्य प्राशन केलेले की, नाही? ते समजू शकते. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे.

आता ब्लड रिपोर्टमध्येच फेरफार झाल्याची शक्यता दिसत आहे. डॉ. अजय तावरे यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु होईल, त्यावेळी या प्रकरणात अजून धक्कादायक गंभीर बाबी समोर येऊ शकतात. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी पडद्यामागे काय-काय चालू आहे? हे यातून दिसतय. याआधी ड्रायव्हरला मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला. त्याला बंगला, पैसा, हे आमिष दाखवण्यात आलं. तो ऐकत नाहीय हे लक्षात आल्यावर डांबून ठेवण्यात आलं. हे सगळ खूप भयानक आणि गंभीर आहे. कायद्याला वाकवण्यासाठी काय-काय चाललय ते यातून दिसतं.