अर्जुन मेदनकर यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ जाहीर

0
196

आळंदी, दि. १० शिक्षक दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या ‘ नॅशनल आयकॉन अवार्ड २०२५ ‘ साठी आळंदी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आवेकर भावे रामचंद्र संस्थांचे विश्वस्त पत्रकार अर्जुन मेदनकर यांची निवड करण्यात आली.

आळंदी पंचक्रोशीसह राज्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान आदी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल अर्जुन मेदनकर यांना उत्कृष्ठ पत्रकारिता क्षेत्रातील नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ जाहीर करण्यात आला आहे. ११ सप्टेंबर रोजी हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे. दैनिक कर्णधार वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून शिक्षक दिन व वर्धापन दिना निमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी नॅशनल आयकॉन अवार्डचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकारिते सह विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या तसेच स्वतःचे कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये आळंदी पुणे येथील अर्जुन मेदनकर यांची पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मान करीत नॅशनल आयकॉन अवार्ड साठी निवड जाहीर करण्यात आली आहे. ११ सप्टेंबर २०२५ रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉल मध्ये पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते पत्रकार अर्जुन मेदनकर यांना पुरस्कार प्रदान करीत गौरविण्यात येणार आहे.