अरुण पवार यांनी दिली मराठवाडा भवनसाठी १० गुंठे जागा

0
56

विविध उपक्रमांनी अरुण पवार यांचा वाढदिवस साजरा

दि. 16 ऑगस्ट (पीसीबी) – गेल्या १२ वर्षात शासन दरबारी खूप प्रयत्न करूनही पिंपरी – चिंचवड शहरात मराठवाडा भवनसाठी जागा मिळू शकली नाही. मात्र, पिंपरी – चिंचवड शहरात मराठवाडा भवन करायचेच, हा निर्धार मनात ठेवून मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांनी स्वतःची पिंपळे गुरव येथील १० गुंठे जागा मराठवाडा भवन बांधण्यासाठी दान केली. आज पिंपळे गुरवसारख्या ठिकाणी तब्बल ४० लाख रुपये प्रति गुंठा जागा असतानाही आपल्या फायद्याचा विचार न करता १० गुंठे जागा दान केल्याने शहरातील मराठवाडा वासियांनी अरुण पवार यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.


चिंचवड विधानसभा मतदारसंघात वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात अरुण पवार यांनी मराठवाडा भवनसाठी जागा देत असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते. यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा ऍड. भारती चव्हाण, ज्येष्ठ प्रबोधनकार शारदाताई मुंढे, ह. भ. प. बब्रुवान वाघ महाराज, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, धारूरचे सरपंच बालाजी पवार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर, अभिमन्यू पवार, प्रवीण कदम, जनकल्याण प्रतिष्ठान बाळासाहेब काकडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, तुषार कामटे, राहुल कलाटे, चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, शिवाजी पाडुळे, बैलगाडा मालक सखाराम काशीद आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब जाधव म्हणाले, की अरुण पवार यांनी प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, कष्टाच्या जोरावर प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांचे हे यश प्रेरणादायी आहे. भावी आयुष्यातही ते मोठी झेप घेतील, असा विश्वास आहे. ऍड. भारती चव्हाण यांनी अरुण पवार यांच्या कार्याचा गौरव केला. शारदाताई मुंडे यांनी अरुण पवार यांच्या व्यावसायिक यशात कुटुंबाची साथही महत्वाची असल्याचे सांगत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. नंदकुमार धुमाळ यांना वृक्षमित्र पुरस्कार, डॉ. शंकर मुगावे यांना वैद्यकीय सेवारत्न पुरस्कार, महंमदशरीफ मुलाणी यांना कामगारभूषण पुरस्कार, राज तेलंगे यांना उद्योगरत्न पुरस्कार, रमेश खरमाळे यांना समाजरत्न पुरस्कार, अॅड सीमा शर्मा यांना विधीरत्न पुरस्कार, शिवाजी खुळे यांना क्रीडारत्न पुरस्कार, तर तानाजी एकोंडे यांना पर्यावरणमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी, लोकशाहीर राजेंद्र कांबळे खडुस्कर यांचा महाराष्ट्राचा मर्दानी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ह भ प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. शिबिरात पावणेदोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले. तसेच वृक्षदान सप्ताहा अंतर्गत १० ऑगस्टपासून ११ हजार वृक्ष रोपांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अभिमन्यू गाडेकर, पुनाजी रोकडे, बी एन कांबळे, अखिल भारतीय छावा संघटनेचे मनोज मोरे, किशोर अटरगेकर, श्री गणेश सहकारी बँकेचे संचालक अंकुश जवळकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब काशीद, राहुल काशीद, महेश जगताप, गणेश कदम, सुभाष जाधव, दगडू दगडे, श्याम जगताप, तानाजी जवळकर, बाळासाहेब पिल्लेवार, प्रदीप गायकवाड, मच्छिंद्र चिंचोले, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, राजेश सातपुते, शंकर तांबे, संजय जाधव, बळीराम माळी, दत्तात्रय धोंडगे, बळीराम कातंगळे, अनिताताई पांचाळ, बालाजी पांचाळ, बाळासाहेब साळुंके, प्रकाश इंगोले, अभिमन्यू पवार, सखाराम वालकोळी, सुग्रीव पाटील, विष्णू शेळके, दिनेश पवार, मानवी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर, अण्णा जोगदंड, मीनाताई करंजवणे, संगीता जोगदंड, गजानन धाराशिवकर, रवी भेंकी, शिवप्पा एस. तालिकोटी, दयानंद जेवळे, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, भिष्माचार्य नागरिक संघ या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासह शहरातील मराठवाडावासिय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक दत्तात्रय धोंडगे यांनी, तर सूत्रसंचालन व आभार कोकाटे यांनी मानले.
———————————————-

अवघ्या दहा मिनिटात मराठवाडा भवनसाठी मिळाली २५ लाखाची देणगी :
अरुण पवार यांनी विचार व्यक्त करताना ‘मराठवाडा भवन’साठी पिंपळे गुरव या ठिकाणी 10 गुंठे (दहा हजार स्क्वेअर फुट) जागा देण्याचे जाहीर करताच मराठवाडा भवनच्या बांधकामासाठी अवघ्या दहा मिनिटात तब्बल २५ लाख रुपयांची देणगी कार्यकर्त्यांनी घोषित केली. याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी देणगीदारांचे कौतुक केले.
——————————————
अरुण पवार राजकारणातही विधायकच काम करणार हा विश्वास : श्रीपाल सबनीस
प्रत्येकाला ‘माऊली’ नावाने बोलणारे अरुण पवार यांनी वृक्षसंगोपन व संवर्धनात तर नाव कमावलेच आहे. याची शासनाने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पोचपावती दिलीच आहे. सेंट्रिंग कामगार म्हणून कामगारनगरीत आलेल्या अरुण पवार यांनी उद्योग, व्यवसाय, अध्यात्म, समाजकारण, राजकारणात घेतलेली झेप प्रेरणादायी आहे. राजकारणात गेले तरी अंतःकारणातला माऊली विसरला जाणार नाही, याची खात्री आहे. कोणत्याही राजकीय पक्षात जावो, ते विधायकच काम करणार यात विश्वास आहे. कारण त्यांच्या पाठीशी फक्त लोकच नाहीत, तर वृक्षांचा आशीर्वाद आहे, ही मोठी गोष्ट आहे. तो आशीर्वादच त्यांना राजकारणात यश निश्चित मिळवून देईल. आज एक फूट जागा सोडायला कुणी तयार नाही. अशा काळात आपल्या मराठवाडा बांधव व संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू लोकांसाठी १० गुंठे जागा देणे, हा मनाचा मोठेपणा आहे. त्यामुळे असा पुढारी राजकारणात गेला, तर राजकारणतली घाण साफ करेल. वारकऱ्यांचे संस्कार असलेली व्यक्ती विधानसभेत गेली तर स्वागतच आहे.