अरुण पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

0
367

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण श्रीपती पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अरुण पवार यांच्या नियुक्तीबद्दल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिनंदन करीत शुभेच्छा देण्यात आल्या.

  यावेळी महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, प्रमुख शहर संघटक अरुण बोऱ्हाडे, नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मयूर कलाटे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, कार्याध्यक्ष राहुल भोसले, प्रशांत शितोळे, विधानसभा अध्यक्ष श्याम लांडे, पंकज भालेकर, नारायण बहिरवडे, सतीश दरेकर, प्रकाश सोमवंशी, विक्रांत लांडे, मोरेश्वर भोंडवे, संगीता ताम्हाने, पौर्णिमा सोनवणे, माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे, कार्याध्यक्ष फजल शेख, दीपक साकोरे, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, विजय लोखंडे, संतोष बारणे, मा, नगरसेवक राजु लोखंडे तानाजी जवळकर, शिवाजी पाडुळे, श्याम जगताप, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब पिल्लेवार, महादेव रोकडे, विष्णू शेळके, उदय ववले आदी मान्यवर उपस्थित होते. 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरात पक्ष संघटन शक्तिशाली व मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहे, असे आश्वासन यावेळी अरुण पवार यांनी दिले. अरुण पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड शहर परिसरात राहणार्‍या सर्व बांधवाना एकत्रित करुन सुसज्ज मराठवाडा भवन निर्मिती संकल्प केला आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहर परिसरात राहणाऱ्या मराठवाड्यातील बांधवांची नोंदणी, निधी संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांनी आजपर्यंत सुमारे एक्कावन हजाराहून अधिक बांधवांची नोंदणी केली आहे.