अरविंद केजरीवाल हे महाविकास आघाडीचा प्रचार

0
2

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसाठी दोघांनीही दंड थोपटलेले पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या पाठोपाठ महाविकास आघाडीही आता प्रचाराला लागली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांकडे महाराष्ट्रसह संपूर्ण देशाच लक्ष लागले आहे. आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी युतीची धडपड सुरू आहे. तर सत्ताधारी युतीला सत्तेवरून खेचण्यासाठी महाविकास आघाडी एकही संधी सोडत नाही. महाविकासआघाडीने निवडणुकांसाठी मोठा प्लॅन केला आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे महाविकास आघाडीचा प्रचार करणर आहेत.

अरविंद केजरीवाल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस साठी प्रचार करणार आहे. दोन्ही पक्षांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राबरोबरच केजरीवार हे झारखंडमध्ये देखील प्रचार करणार आहेत. महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांच्या विभागवार जाहीर सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीच्या प्रचारासठी पंतप्रधान मोदी येणार
विधानसभा निवडणुकांसाठी खूप कमी दिवस राहिले असल्याने जास्त सभा घेणे शक्य नसल्याची चर्चा आहे. मात्र प्रत्येक विभागात एक तरी सभा पंतप्रधान मोदी यांची घेण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे. महायुतीच्या नेत्यांसाठी आणि उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात सभाचा धडाका लावण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी मोदी जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबचे वेळापत्रक येण्याची शक्यता आहे.

कोण बाजी मारणार?
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या प्रचाराच्या रणनीती ठरलेल्या आपल्याला पाहायला मिळतायेत. मात्र प्रश्न उरलाय तो जागा वाटपांचा आणि प्रचारासोबतच जागा वाटपाला सुद्धा युती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरुवात झालेली आहे. जागा वाटप करताना अनेक जागांवर तिढा आहे. कारण युती आणि आघाडीत नवीन भिडू पहिल्यांदा सहभागी झालेले आहेत. त्यामुळे जागावाटप करताना दोघांनाही डोकेदुखी तर असणारच आहे मात्र रुसवे फुगवे ही यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. यात कोण बाजी मारणार आणि कोण आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.