अरब अमीरातच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग

0
337

विदेश, दि. १५ (पीसीबी) – काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आता त्याच्या मित्र देशांचा देखील पाठिंबा मिळताना दिसत नाहीये. पाकिस्तानचा जवळचा सहकारी समजला जाणारा देश अरब अमीरातने देखील पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केलं आहे. यासाठी संयुक्त अरब अमीरातने एक नकाशाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर भारताचा भाग असल्याचे दाखवून दिले आहे. हा पाकिस्तानला एक मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार संयुक्त अरब अमीरातचे उप प्रधानमंत्री सैफ बिन जायद अल नाहयान यांनी दिल्लीत झालेल्या शिखर परिषदेचा एका व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये भारत मध्य-पूर्व-युरोप इकोनॉमिक कॉरिडोर दाखवण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे यूएईचे उप पंतप्रधान यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओत संपूर्ण काश्मीरला भारताचा भाग दाखवण्यात आले आहे. यावर पीओके आणि अक्साई चीनच्या भागाचा देखील समावेश आहे.

महत्वाचे म्हणजे भारताकडून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताचा भाग असल्याचा दावा खूप पूर्वीपासून केला जात आहे. नुकतेच भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील पीओके भारताचा भाग आहे आणि नेहमीच राहिल असे म्हटले होते, पाकिस्तान सरकार पीओके त्यांचा असल्याचे सांगत आले आहे.यादरम्यान संयुक्त अरब अमीरात या इस्लामिक देशाने भारताला पाठिंबा देणे मोठे यश मानले जात असून पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भारत-मध्य पूर्व इकॉनॉमिकल कॉरिडोर नुकतेच आजोजन करण्यात आलेल्या जी२० शिखर सम्मेलनादरम्यान लाँच करण्यात आला होता. या ठरावाच्या घोषणेनंतर जगभरातून याबद्दल प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या डीलमधअये सौदी अरेबिया आणि अमेरिका हे देखील सहभागी आहेत. तसेच रशियाने देखील याचं कौतुक केलं आहे.

यूएईच्या एका रिअल इस्टेट कंपनीने काश्मीरमध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. ए्म्मार या दुबईस्थित यूएईच्या रिअल इस्टेट डेव्हलपरने श्रीनगरमध्ये मॉल बांधण्याचे कंत्राट मिळवले आहे आणि हा मॉल 10 लाख स्क्वेअर किलोमीटरवर बांधला जात आहे.