अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार

0
219

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये राज्यात कोणकोणत्या कामाला राज्य सरकारने मान्यता दिली, तसेत कोणकोणते विकास कामे सुरु करण्यात आले आहेत, याची सविस्तर माहिती यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

कोणत्या मोठ्या घोषणा केल्या?

-जीएसटीची केंद्राकडून 8000 कोटी रुपये मिळाले.

-सहा वंदे ट्रेन भारत सेवा सुरु झाल्या आहेत.

-नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचं भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

-नरीमन पॉईंट ते वरळी कोस्टल रोडमुळं 70 टक्के वेळ वाचणार आहे.

-फलटण ते पंढरपुर रेल्वेमार्गाला मंजूरी देण्यात आली आहेत.

-नियोजित रस्त्यांसाठी सहा हजार कोटींचा प्रस्ताव आहे.

-19 हजार 900 कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.

-नगर विकास विभागासाठी 9 हजार कोटींचा निधी देण्यात आला.

-फलटण ते पंढरपूर महामार्गाला मान्यता देण्यात आली.

-शकुंतला रेल्वेसाठी 50 टक्के मदत करण्यात आली आहे.

नगर विकाससाठी 10 हजार कोटी तर सार्वजनिक बांधकाम विभागाला 19 हजार कोटी देणार.
नवीन सूक्ष्म व लघु उद्योग धोरण लागू केले जाणार आहे.
दाओसमधील करारानुसार, तीन लाखांहून अधिक उद्योग राज्यात येणार आहेत.
राज्यात 18 लघु उद्योग स्थापन करण्यात येतील.
राज्याची 1 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे.
वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत केला जाणार आहे.
सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणखी सुरु करणार आहेत.
मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
उर्जा विभागाला खर्चासाठी 11 हजार कोटी रुपयांचा निधी प्रलंबित
विदर्भातला अनुशेष दूर करण्यासाठी 2 हजार कोटींची तरतूद
शहरातील महिलांना 5000 पिंक रिक्षा दिल्या जातील.
महिला आणि बाल विकास खात्यासाठी 3700 कोटी रुपयांची तरतूद.
आशियाई स्पर्थेत खेळाडूंना सुवर्णला 1 कोटी, रौप्य 75 लाख तर कांस्यला 50 लाख रुपये बक्षिस देणार.
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार
लोणावळ्यात 300 कोटी रुपयांचा स्कायवॉक उभारला जाईल.