अयोध्येत गर्दीमुळे पोलिसांचा लाठी चार्ज, मुख्यमंत्री तातडिने रवाना

0
152

अयोध्या, दि. २३ (पीसीबी) – अयोध्येतील मंदिरात काल (सोमवार) रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. दरम्यान आज (बुधवार) रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी रामभक्तांना नियंत्रिक करण्याचे प्रयत्न केले पण मात्र भाविकांच्या संख्या मोठ्या संख्येने असल्यामुळे चेंगाचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलीस आयुक्त, महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लाऊडस्पीकर हातात घेऊन भाविकांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे लक्षात आल्याने खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येकडे कूच केली आहे.

त्यानंतर काही वेळाने पोलीस महासंचालक प्रशांत कूमार आणि प्रधान सचिव गृह संजय प्रसाद हेही राममंदिरात पोहचले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी घेतली. प्रचंड गर्दी पाहता इतर जिल्ह्यातून अयोध्येकडे येणाऱ्या मार्गांवरूनही वाहने थांबवली जात आहेत. अयोध्येतील प्रचंड गर्दी झाल्यामुळे भाविकांना दुसऱ्या दिवशी दर्शनाला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अयोध्येत पाचशे मीटर अंतरावर तीन विभागात बॅरिकेड्स लावून भाविकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र जमावाच्या दबावाखाली हे गेट तोडले. त्यामुळे अनेक भाविकच नव्हे तर पोलीस कर्मचारीही जखमी झाले.भाविकांनी बॅरिकेडिंग ओलांडून आत प्रवेश केल्यावर सकाळी 11.30 वाजता आरतीसाठी मंदिरातील दर्शन काही काळ थांबवण्यात आले, मात्र गर्दी कायम राहिल्याने पुन्हा दर्शन सुरू करण्यात आले.