- शहरातील राम मंदिरांना भेट देत बारणे यांनी साधला रामभक्तांशी संवाद
- खासदार बारणे यांनी स्वतःच्या हाताने वाढला महाप्रसाद
चिंचवड, दि. 17 एप्रिल – श्रीराम नवमीनिमित्त शहरातील विविध राम मंदिरांमध्ये जाऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले तसेच काम भक्तांशी संवाद साधला. सुमारे पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर उभारणीमुळे देशात नवचैतन्य निर्माण झाल्याच्या भावना बारणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
नवलाख उंब्रे येथील प्राचीन राम मंदिरात दर्शन
खासदार बारणे यांनी रामनवमी निमित्त मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथील प्राचीन स्वयंभू राम मंदिर, थेरगाव येथील श्रीराम-जानकी मंदिर, रहाटणी, चिंचवड व प्राधिकरण पेठ क्रमांक 27 येथील राम मंदिरांत जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या समवेत तानाजी बारणे, मयूर बारणे, दीपक गुजर, गौरव जाधव, भरत जाधव, प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर आदी कार्यकर्ते होते.
नवलाख उंब्रे येथील प्राचीन स्वयंभू राम मंदिरात श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहास बारणे यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांच्या समवेत निवृत्ती शेटे, बाळासाहेब नेवाळे, शरद हुलावळे, बाळासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी होते. हभप गौरव महाराज उडापे यांचा बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अंतूभाऊ नरवडे, विक्रम कदम, संतोष नरवडे, नागेश शिर्के, संतोष पापळ आदींनी खासदार बारणे यांचे स्वागत केले.
थेरगाव येथील श्रीराम-जानकी मंदिरात अध्यक्ष गुलाब तिवारी व पुजारी सभाशंकर तिवारी यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. रहाटणी येथे अंकुशराव राजवडे, अजय कदम, आदेश राजवडे यांनी बारणे यांना श्रीरामाचा प्रसाद देऊन निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
चिंचवड गावातील राम मंदिरात मुख्य विश्वस्त श्रीकांत देव तसेच पुजारी नितीन राजर्षी व कौस्तुभ रबडे यांनी बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. त्यावेळी माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडेही उपस्थित होत्या. निगडी प्राधिकरण पेठ क्र. 27 येथे श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने सागर दिवाकर व लक्ष्मीशेठ अग्रवाल यांनी बारणे यांचे स्वागत केले.
रामभक्तांशी संवाद
ठिकठिकाणी बारणे यांनी रामभक्तांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयध्येत राम मंदिर उभारणीचा दिलेला शब्द पाळला आहे. हे केवळ राम मंदिरच नाही तर राष्ट्र मंदिर आहे. प्रभू श्रीराम हे भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिल्यामुळे संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण झाले असून नव्या आत्मविश्वासाने देश पुढील प्रगती करणार आहे, असे बारणे म्हणाले.
रामनगरमध्ये महाप्रसाद वाटप
चिंचवड रामनगर येथील श्रीराम सेवा ट्रस्ट आयोजित रामजन्मोत्सवात सहभागी होऊन खासदार बारणे यांनी स्वतःच्या हातांनी रामभक्तांच्या पंगतीला महाप्रसादाचे वाटप केले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अमर दौंडकर व राहुल दौंडकर व अन्य पदाधिकाऱ्यांना खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला.
देहूरोड येथील वैश्य समाज मंदिरातील श्रीराम जन्मोत्सवास खासदार बारणे उपस्थित होते. विशाल खंडेलवाल, सुरेश बन्सल, सुमित जिंदल, सुनील गोयल, अमित बन्सल, अमित शर्मा, आशिष बन्सल, राहुल गोयल आदींनी त्यांचे स्वागत केले. बारणे यांना श्रीरामरायाचा प्रसाद देऊन निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.