पुणे , दि. २९ (पीसीबी) – लतानपूरमध्ये भाविकांनी भरलेली बस दुभाजकाला धडकून उलटल्याने अपघात झाला असून या अपघातात पुण्यातील २८ भाविक गंभीर जखमी झाले आहे. गोसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बायपास येथील टाटिया नगर चौकातील ही घटना आहे.
दत्तात्रेय, सुनील दातोवा, काशिनाथ लांडगे, मधुकर, हेमलता डोगरी, शांता, दिलीप, सुनील, दत्ता जोरी, माहेश्वरी, सुशीला नागेड, रेश्मा लानराडे, आरुष सुरेश, सविता, शोभा, दीपक आणि गजानंद असे जखमी झालेल्या भाविकांचे नावी आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, दर्शनानंतर सर्व भाविकांनी अयोध्या दर्शनाला जाण्यासाठी ८ टुरिस्ट बसेस आरक्षित केल्या. भाविकांसह सर्व टुरिस्ट बसेस अयोध्या दर्शनासाठी जात होत्या. बस मंगळवारी (ता. २७) तीन वाजण्याच्या सुमारास गोसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील तात्यानगर बायपास चौकात आली. त्यानंतर अचानक बस महामार्गावर बांधलेल्या दुभाजकला धडकली आणि अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटली. बसमधील २८ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. त्याना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.










































