अमेरिकेत गुजराती लॅब मालकाला तब्ब्ल २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, कारण…

0
358

विदेश,दि.१९(पीसीबी) – अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या लॅब मालकाला तीन वर्षांहून अधिक काळ मेडिकेअरची फसवणूक शिवाय ४६.३ कोटी डॉलर्सचा जेनेटिक टेस्ट घोटाळा केल्याप्रकरणी २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिनल पटेल असे या भारतीय वंशाच्या गुजराती लॅब मालकाचे नाव आहे. रुग्णांना आवश्यक नसलेल्या आणि इतर जेनेटीक टेस्टद्वारे पटेल यांनी मोठा घोटाळा केल्याचा त्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे.

मेडिकेअर लाभार्थ्यांनी चाचण्या घेण्यास सहमती दिल्यानंतर टेलीमेडिसिन कंपन्यांकडून चाचण्या अधिकृत करणाऱ्या डॉक्टरांच्या स्वाक्षरी केलेल्या ऑर्डर मिळविण्यासाठी पटेल यांनी रुग्णांच्या दलालांना लाच दिली, असे न्याय विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पटेल यांनी रुग्णांच्या दलालांना लॅब सोल्युशन्ससाठी कायदेशीर जाहिरात सेवा पुरवत असल्याचे खोटे सांगून करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले.

जुलै २०१६ ते ऑगस्ट २०१९ पर्यंत, लॅब सोल्युशन्सने मेडिकेअरला ४६३ कोटी अमेरेकी डॉलर्स पेक्षा जास्त दावे सादर केले. या दाव्यांमध्ये हजारो वैद्यकीयदृष्ट्या अनावश्यक अनुवांशिक चाचण्यांचाही समावेश आहे, ज्यासाठी राष्ट्रीय आरोग्य विमा कार्यक्रमाने १८७ अमेरिकी डॉलर्स जास्त पैसे दिले आहेत. त्या कालावधीत, पटेल यांनी फसवणुकीच्या संबंधात मेडिकेअरकडून वैयक्तिकरित्या २१ अमेरिकी डॉलर्स प्राप्त केले.