$10 अब्ज मूल्यमापन असलेल्या रिपलिंग ( टेक कंपनीचे सह-संस्थापक प्रसन्ना शंकरयांनी रविवारी सोशल मीडियावर आपला घटस्फोट सुरु असल्याचं जाहीर केलं. त्यांनी पत्नी दिव्या शशिधर वर विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा आरोप केला आणि तिने त्यांच्या ९ वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याचा दावा केला.
पत्नीचे आरोप : लैंगिक विकृती-
दिव्या शशिधर, अमेरिकेच्या नागरिक असून, तिने चेन्नई पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिचा पती प्रसन्ना याने मुलाचे अपहरण केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिव्याने पतीवर ‘sexual pervert’ असल्याचा आरोप करत गंभीर गुन्ह्यांचा पाढा वाचला.
तिने सांगितले की, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वेश्या व्यवसायासाठी संपर्क साधल्याप्रकरणी प्रसन्नाला (Prasanna Shankar) अटक झाली होती, आणि त्याचा परिणाम म्हणून त्याची नोकरी गेली. दिव्याने असा आरोप केला की प्रसन्ना महिलांवर लैंगिक अत्याचार करताना छुपे कॅमेरे वापरत असे आणि तिलाही त्याच स्वरूपाचा छळ सहन करावा लागला.
तिच्या म्हणण्यानुसार, प्रसन्नाच्या वडिलांनी देखील तिच्या सासूवर अत्याचार केले होते आणि त्यांना घराबाहेर हाकलून दिलं होतं. या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा होणं अशक्य झालं आहे. ती सध्या यूएस दूतावास आणि चेन्नई पोलिसांच्या मदतीने मुलाच्या ठावठिकाणाचा शोध घेत आहे.
खोट्या आरोपांचा प्रतिशोध-
प्रसन्ना शंकर यांनी पत्नीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, घटस्फोटाची मूळ कारणं दिव्याचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनूप नावाच्या व्यक्तीसोबत असलेल्या अफेअरचे पुरावे त्यांना अनूपच्या पत्नीने दिले, ज्यात चॅट्स, कंडोम खरेदीचा उल्लेख आणि दोन लोकांसाठी हॉटेल बुकिंगचा समावेश होता.
त्यांनी स्पष्ट केलं की, ₹९ कोटींच्या सेटलमेंटनंतर आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानं दिव्याने बदला घेण्याच्या हेतूने गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, त्यांच्या मुलावर त्यांचाच कायदेशीर हक्क आहे, जो एमओयूमधून स्पष्ट झालेला आहे आणि मुलगा “स्वेच्छेने” त्यांच्या ताब्यात देण्यात आला होता.













































