- भारतासह 75 देशांना हुए ‘रेसिप्रोकल टॅरिफ’मधून 90 दिवसांसाठी दिलासा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर मोठा आर्थिक प्रहार केला आहे. चिनी उत्पादनांवर त्यांनी 125 टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. त्याआधी अमेरिकेने हा दर वाढवून 104 टक्के केला होता. त्यानंतर चीननेही अमेरिकेतून येणाऱ्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवून 84 टक्के केलं होतं. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन घोषणा केली आहे. त्यांनी भारतासह 75 देशांना हुए ‘रेसिप्रोकल टॅरिफ’मधून 90 दिवसांसाठी दिलासा दिला आहे. या कालावधीत फक्त 10 टक्के शुल्क लागू राहीलं.
दि . १० ( पीसीबी ) – जगातील अनेक बड्या देशांमध्ये व्यापारी तणावाने टोक गाठलेलं असताना हा निर्णय आला आहे. जागतिक मंदीची भिती व्यक्त होत आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाकडे चीनवर दबाव टाकण्याची रणनिती म्हणून पाहिलं जात आहे. दुसरीकडे टीकाकारांच म्हणणं आहे की, जागातील बाजारांच कोसळणं आणि मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या टीकेमुळे ट्रम्प यांनी हा ‘यु-टर्न’ घेतला आहे. “मी 90 दिवसांसाठी PAUSE घेतला आहे. या दरम्यान अन्य देशांसाठी ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ कमी करुन 10 टक्के करतोय. तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू होत आहे” असं ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर म्हटलं आहे.
चिनी वस्तुंच्या आयातीवर 125 टक्के कर आकारणीचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय हे आतापर्यंतच सर्वात आक्रमक पाऊल मानलं जातय. “चीनने जागतिक बाजाराप्रती सन्मान दाखवलेला नाही. त्या बदल्यात अमेरिका आता 125 टक्के शुल्क वसूल करेल. चीनने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की, अमेरिका आणि अन्य देशांचे शोषण आता सहन करणार नाही” असं ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलय.
अमेरिकेने सुरु केलेल्या या टॅरिफ अभियानात भारतासह 75 देशांना दिलासा मिळाला आहे. या देशांवर नवीन टॅरिफ दर लागू होणार नाही. त्यांना 90 दिवसांची सवलत देण्यात आली आहे. या अवधीत फक्त 10 टक्के शुल्क आकारलं जाईल. “ज्या देशांनी अमेरिकेविरोधात प्रत्युत्तराची कारवाई केली नाही, त्यांच्यासाठी हे इनाम आहे” असं अमेरिकेचे ट्रेजरी सचिव बेसेंट यांनी सांगितलं. मॅक्सिको आणि कॅनडा या देशांचा सुद्धा 10 टक्के टॅरिफ स्लॅबमध्ये समावेश करण्यात आला आहे.