अमेरिका-इराणचं युद्ध थांबलं, दुसरीकडे उत्तर कोरियाकडून मिसाईल लाँच आता कोण निशाण्यावर!

0
1
FILE - In this photo distributed by the North Korean government, North Korean leader Kim Jong Un, center, walks near what it says is a Hwasong-17 intercontinental ballistic missile (ICBM) on the launcher at an undisclosed location in North Korea on March 24, 2022. Independent journalists were not given access to cover the event depicted in this image distributed by the North Korean government. The content of this image is as provided and cannot be independently verified. Korean language watermark on image as provided by source reads: "KCNA" which is the abbreviation for Korean Central News Agency. (Korean Central News Agency/Korea News Service via AP, File)

दि.०८(पीसीबी)अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अखेर कमी झाला असून, दोन्ही देशांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे जगभरातून सुटकेचा निश्वास सोडला जात असतानाच, उत्तर कोरियाच्या हालचालींनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चिंता वाढवली आहे.

उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने तत्काळ अलर्ट जारी केला आहे. क्षेपणास्त्राची दिशा, उंची आणि अंतर याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

गेल्या काही महिन्यांपासून उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या करत आहे. या चाचण्या जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. जपान सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, देशभरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे लष्करी ताकद दाखवण्यासाठी आणि शेजारील देशांना इशारा देण्यासाठी अशा चाचण्या करत असल्याचे मानले जाते. तसेच अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावांना उत्तर म्हणूनही या चाचण्या घेतल्या जात असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

गेल्या काही काळात उत्तर कोरियाने हायपरसॉनिक आणि कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली असून, यावेळीही अतिवेगवान क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.एकीकडे शस्त्रसंधीमुळे दिलासा मिळत असतानाच, उत्तर कोरियाच्या या कृतीमुळे जागतिक शांततेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.