अमित शाह विरोधात वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा

0
237

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारी नंतर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या जन्मस्थान आणि भाषेवरून विद्या चव्हाण यांनी टीका केली होती. त्यांनंतर भाजपच्या कंबोज यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध कलमांअंतर्गत मोहित कंबोज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि किरीट सोमय्या यांच्याविषयी केलेल्या व्यक्तव्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याबद्दल मोहित कंबोज यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

विद्या चव्हाण यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती, त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध मुंबईतील सांताक्रूझ पीएस येथे आयपीसी कलम ५००, ५०५(२), १३५ आणि ३७(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.