शहरातील हॉटेल व्यावसायिक संघटना आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत कुटुंबाने चार टर्म नगरसेवक माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी तसेच दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांचे धाकटे बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, सौ. शारदा बाबर आणि त्यांचे चिरंजीव अमित यांनी आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का आहे. शेट्टी यांचे बंधू जगदीश शेट्टी हे राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.
बाबर हे सांगली–सातारा–कोल्हापूर मित्र मंडळाचे सक्रिय सदस्य म्हणून परिचित आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्यात त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे.
यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, दक्षिण भारत आघाडीचे प्रमुख राजेश पिल्ले, सरचिटणीस शितल शिंदे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, राजु मिसाळ, प्रशांत शितोळे, शांतराम बापू भालेकर, राजु दुर्गे आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, अनुराधा गोफणे, सामाजिक कार्यकर्ते देवीदास गोफणे, अमित बाबर आणि महेश सहकारी बँकेचे अजय लढ्ढा, महेश काटे, संजय जगताप, लवकुश यादव, चेतन शेटे, गणेश कंकावणे, ऋिषी शेट्टी यांच्या प्रवेशामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.














































