अभिषेक घोसाळकरांची हत्या, माणुसकीला काळीमा फासणारी घटना – अजित पवार

0
196

पुणे, दि. ९ (पीसीबी) : मुंबईमधील दहिसरमध्ये ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. याआधी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला टार्गेट केले जात आहे. अभिषेक घोसळकर यांच्या हत्येवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘ही घटना अतिशय चुकीची घडली आहे. अशी घटना महाराष्ट्रात घडताच कामा नये, या मताचा मी आहे. तुम्ही पाहिले असेल की दोघांचे संबंध चांगले दिसत आहे. याचा तपास नीट झाला पाहिजे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. कुठल्याही राज्यात, शहरात असे होता कामा नये’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

‘तुम्ही व्हिडिओत पाहिले असले ते अतिशय चांगल्या गप्पा मारत होते.याचा नीट तपास व्हायला हवा. कारण आता विरोधक सरकारची बदनामी करत आहेत. गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांना निमित्त मिळालं आहे. मात्र, या मागची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे. झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे.’ असे देखील पवार म्हणाले.

गोळीबार प्रकरणा नंतर सरकारवर, पोलिसांवर विरोधक टीका करत असताना अजित पवार यांनी सरकार पोलिसांची पाठराखण केली. राज्यात झालेल्या तीनही गोळीबाराच्या घटना वेगळ्या आहेत. गोळीबार खासगी पिस्तुलमधून झाले आहेत. त्यामुळे पिस्तूल देताना सगळ्या बाजू तपासल्या पाहिजेत. मुळशीत झालेला गोळीबार हा गुंडांच्या आपआपसातील भांडणातून झाला होता. तर, पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार कशामुळे झाले हे तपासात समोर येईलच. पोलिसांनी कौतुक करायला हवे त्यांनी गणपत गायकवाड यांना तत्काळ अटक केले.