अभिवचन रजेवर आलेला कैदी कारागृहात परतलाच नाहीरावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
2

रावेत, दि. 19 (पीसीबी)
छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैदी अभिवचन रजेवर आला. मात्र रजा संपल्यानंतर तो कारागृहात परत गेला नाही. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन संजय गिरी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर कारागृहातील पोलीस अंमलदार सुभाष इंगळे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन गिरी हा छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. 18 जुलै 2024 रोजी त्याला प्रवासासह चार दिवस लग्न अभिवचन रजा देण्यात आली. त्यानंतर त्याची रजा चार दिवसांनी वाढविण्यात आली. तो 25 जुलै 2024 रोजी कारागृहात परत येणे अपेक्षित होते. मात्र तो रजा संपल्यानंतर कारागृहात परतला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.