अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी इको फ्रेंडली गणपती

0
94

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी इको फ्रेंडली गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. यावर्षी बाल गणेश सोनालीच्या घरी विराजमान झाले आहेत. महिलांना समाजात सुरक्षित आणि स्वातंत्र्याने जगता यावं, यासाठी सोनालीने गणपती बाप्पांकडे साकडे घातले आहे. सोनाली आणि सोनालीचा भाऊ गेल्या पाच वर्षांपासून शाडू माती पासून गणपती बनवतात. यावर्षी देखील सोनालीने बाल गणेशाचे रूप साकारत सुरेख आणि सुबक अशी मूर्ती बनवलेली आहे. तेच बप्पा सोनालीच्या घरी विराजमान झाले आहेत.

सोनाली म्हणाली, प्रत्येक वेळी आपण केवळ महिला अत्याचारांवर बोलतो. पीडितांना न्याय मिळावा म्हणून अनेक मोर्चे काढतो. आपण रस्त्यांवर देखील उतरतो. सोशल मीडियावर अनेक गोष्टी पोस्ट करतो. हे असं चक्र फिरतच राहतं. परंतु, हे चक्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यातून मार्ग काढला पाहिजे. अशा पद्धतीने रस्त्यांवर येऊन न्याय मागण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा सोनालीने व्यक्त केली आहे.