मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झाल आहे.
तिच्या निधनाने संपूर्ण कलाक्षेत्रासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अवघ्या ३८ व्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास घेतला. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली.
2005 साली ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेमधून प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमधील त्यांच्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः तिच्या व्हिलनच्या भूमिकेने चाहत्यांचे मन जिंकले.
हिंदी मालिकांमध्ये त्यांच्या प्रवासाची सुरुवात ‘कसम से’ या मालिकेतील ‘विद्या बाली’ या भूमिकेपासून झाली. पुढे ‘पवित्र रिश्ता’मध्ये ‘वर्षा’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’मध्ये ‘ज्योती माल्होत्रा’च्या भूमिकांनी तिने घराघरात पोहोचवले.