अभिनेत्री करिश्मा कपूर हुबेहूब कॉपी पाहिलीत का…

0
72

मुंबई, दि. 29 (पीसीबी) : अभिनेत्री करिश्मा कपूर हिने 90 व्या दशकात फक्त बॉलिवूडवर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण करिश्मा कपूर हुबेहूब तिच्यासारख्या दिसणाऱ्या एका तरुणीमुळे चर्चेत आली आहे. करिश्मा कपूर हिची एक चाहती आहे, जी हुबेहूब अभिनेत्री सारखी दिसते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. करिश्माच्या चाहतीला पाहिल्यानंतर अनेकांना विश्वास देखील बसणार नाही.

हुबेहूब करिश्मा सारख्या दिसणाऱ्या तरुणीचं नाव हिना असं आहे. हिना करिश्मा फार मोठी चाहती आहे. हिना कायम करिश्माच्या सिनेमांमधील लूक कॉपी करत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. हिनाच्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर 12 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहे.

व्हिडीओ नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘डोळे हुबेहूब करिश्मा सारखीच आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘वाह, लोलो…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही हुबेहूब करिश्मा सारखी दिसते…’ हिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर हिना हिने 273K फॉलोअर्स आहेत. तर हिना फक्त 168 जणांना फॉलो करते.

करिश्मा कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल है’, ‘राजा बाबू’, ‘मर्डर मुबारक’, ‘जीत’, ‘हम साथ साथ है’, ‘हिरे नं 1’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. करिश्मा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. करिश्मा हिने घटस्फोटानंतर कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्रीने सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ केला.

https://www.instagram.com/reel/Cdn3cKLIp4D/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. अभिनेत्रीने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. करिश्मा हिने पती आणि सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. आता करिश्मा दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.