अभिनेत्रीनं राहत्या घरात संपवलं आयुष्य

0
159
  • मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला प्रसिद्ध अभिनेत्रीनं आत्महत्या केली असून मुंबई येथील राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. नूर मालाबिका असं अभिनेत्रीचं नाव आहे. 37 वर्षीय नूर मालाबिक यापूर्वी कतार एअरवेजमध्ये एअर होस्टेस होती.

शेजाऱ्यांना अभिनेत्रीच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यानं त्यांनी तात्काळ त्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अभिनेत्री तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह सडला होता. मुंबईतील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ममदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट NGOनं अभिनेत्रीवर रविवारी अंत्यसंस्कार केले.

पोलिसांनी 6 जून रोजी लोखंडवाला येथील त्यांच्या फ्लॅटमधून मृतदेह ताब्यात घेतला. अभिनेत्रीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. अहवाल आल्यानंतरच अधिक माहिती मिळेल.

पोलिसांनी सांगितलं की, ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंध येऊ लागला. त्यांनी तत्काळ ओशिवरा पोलिसांना माहिती दिली. पथक घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी दरवाजा तोडला आणि आत गेल्यावर पोलिसांना नूरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेला आढळला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता औषधे आणि मोबाईल फोन आणि डायरी जप्त केली.

अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला मात्र कोणीही पुढे आलं नाही. यानंतर शहरातील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एनजीओच्या मदतीने पोलिसांनी रविवारी, 9 जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

नूर मलाबिका आसामची होती आणि तिने अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले होते. यामध्ये ‘सिसियान’, ‘वॉकमन’, ‘तिखी चटनी’, ‘जगन्या उपया’, ‘चार्मसुख’, ‘देखी उंडेखी’, ‘बॅकरोड हसल’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्याच वेळी, ती डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित ‘द ट्रायल’ मध्ये काजोल आणि जिशु सेनगुप्तासोबत दिसली होती.