अभिनेते सतीश शाह यांचे निधन मनोरंजनविश्वातून दु:खद बातमी आली

0
4

टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा अभिनेते सतीश शाह यांनी वयाच्या ७४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

किडनी फेल झाल्यामुळे त्यांना शनिवारी दुपारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची मृत्यूची झूंज अपयशी ठरली. अशोक पंडित यांनी एक व्हिडिओ शेअर करत, ‘तुम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की, आमचे प्रिय मित्र आणि हरहुन्नरी अभिनेते सतिश शाह यांचं काही तासांपूर्वी किडनी फेल्युअरमुळे निधन झालं. त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमच्या इंडस्ट्रीसाठी हे मोठं नुकसान आहे. ओम शांती.’ अशा आशयाची कॅप्शन देत शाह यांच्या निधनाची माहिती दिली.

सतिश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका केल्या, पण ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मध्ये इंद्रवर्धन साराभाई, ज्याला इंदू म्हणूनही ओळखलं जातं, या भूमिकेने त्यांना घराघरात लोकप्रिय केलं. या कॉमेडी शोमध्ये त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयानेप्रेक्षकांचं मन जिंकलं. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ हा एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप कॉमेडी शो होता आणि आजही, त्यातील व्हिडिओ क्लिप्स दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात.

सतिश शाह यांनी १९७० मध्ये ‘भगवान परशुराम’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, पण त्यांना खरी ओळख अरविंद देसाई यांच्या ‘अजीब दास्तान’ चित्रपटाद्वारे मिळाली. यानंतर त्यांनी गमन, उमराव जान, पुराण मंदिर, आशिक आवारा, कभी हान कभी ना, हम आपके है कौन, हम साथ साथ है, कहो ना प्यार है, मस्ती, मुझसे शादी करोगी, जाने भी माँ न हो, यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.