दि.११ (पीसीबी)-शोलेतल्या ‘विरु’सह अनेक सशक्त भूमिका साकारणारे दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. ते ८९ वर्षांचे आहेत. मागील १२ दिवसांपासून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यावर सलमान खान, शाहरुख खान, अमीषा पटेल, गोविंदासह अनेक बॉलीवूड स्टार्स त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण सोमवारी, १० नोव्हेंबरला त्यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्या येऊ लागल्या. नंतर हेमा मालिनी यांनी पोस्ट करून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली.
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्याही येत आहेत, पण या बातम्या खोट्या असल्याचं ईशा देओलने म्हटलंय. “माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्या, अशी मी सर्वांना विनंती करते. माझे वडील बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार,” असं ईशा देओलने पोस्टमध्ये लिहिलं आहे.










































