अभिनेता सयाजी शिंदे रुग्णालयात

0
304

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सयाजी शिंदे यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना 11 एप्रिल रोजी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.साताऱ्यातील प्रतिभा रूग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माध्यमांशी बोलत असताना सयाजी शिंदे यांच्या डॉक्टरांनी मोठी अपडेट दिलीये.

मागील आठवड्यामध्ये सयाजी शिंदे यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांनी रूटीन चाचण्या केल्या. त्यातून हृदयाची हालचाल कमी होत असल्याचं जाणवलं. हे पाहता त्यांच्या अँजिओग्राफी करण्यात आली. त्यातील 3 पैकी 1 रक्तवाहिन्यामध्ये 99 टक्के ब्लॉक आढळला.

सयाजी शिंदे यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती पाहता दोन दिवसांमध्येच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सयाजी शिंदे यांच्या