अब्दुल सत्तारांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन पदमुक्त करा – अजित गव्हाणे

0
198

पिंपरी,दि.7 (पीसीबी) – राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्र्यांची सातत्याने बेताल आणि बेजाबदार वक्तव्ये सुरू असून तमाम महिलांचा अवमान या मंत्र्यांकडून केला जात आहे. आमच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासारख्या संसदरत्नाबद्दल अब्दुल सत्तार यांनी केलेली वक्तव्ये ही अत्यंत अश्लाघ्य, निंदनिय आणि निषेधार्ह आहेत. सत्तार यांनी केवळ माफी मागून चालणार नसून त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत मत प्रदर्शित करताना अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरली होती. त्याचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अजित गव्हाणे बोलत होते.

पुढे बोलताना अजित गव्हाणे म्हणाले, खोके घेऊन स्वत:च्या पक्षाची गद्दारी करणे मंत्री झाले आहेत. पैसा आणि सत्तेच्या जोरावर त्यांची सध्या बेताल वक्तव्ये सुरू आहे. तमाम महिला वर्गाचा अवमान करण्याएवढी त्यांची मजल पोहोचेली आहे. केवळ माफी मागून चालणार नाही. अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरणार्या अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून सत्तारांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविली जार्ईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

महिलाध्यक्षा कविता आल्हाट म्हणाल्या, सुपियाताईंबद्दल बोलण्याची लायकी नसणार्या सत्तारांनी सत्ता आणि पैशांच्या मस्तीतून हे वक्तव्य केले आहे. ज्यांच्या खोक्याची किर्ती संपूर्ण राज्यभर पसरली आहे. सुसंस्कृती महाराष्ट्राच्या परंपरेला काळींबा फासण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री करत आहेत. त्यांना आवरणारेच कोणी राहिलेले नसल्याने उन्मादी बनलेले हे मंत्री महिलांचा अवमान करत आहेत. येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता या लोकांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही आल्हाट म्हणाल्या.

यावेळी झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष अजित गव्हाणे महिला अध्यक्ष कविता अल्हाट माजी नगरसेविका शमीम पठाण, माजी नगरसेवक मयूर कलाटे, प्रवीण भालेकर, प्रसाद शेट्टी, संतोष बारणे, यांच्यासह विजय लोखंडे, शहर खजिनदार दीपक साकोरे पंडित गवळी, शितल हगवणे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, सोशल मिडीया समन्वयक समीर थोपटे, संजय अवसरमल, मनिषा गटकळ, सारिका पवार, कविता खराडे, दत्तात्रय जगताप,अकबर मुल्ला, सुनिता अडसूळ, निर्मला माने, संगीता कोकणे, उज्वला शिंदे, पुनम वाघ, रवीआप्पा सोनवणे, ज्योती निंबाळकर, मिरा कदम, तृप्ती सोमनाथ मोरे, सुप्रिया सोलंकुरे, स्मिता भोसले, धनंजय भालेकर, मिरा कुदळे, प्रफुल्ल महोत्सलिंग, अनंत सुपेकर, ऋषिकेश शिंदे, झीनत इनामदार, उत्त्म कांबळे, तुषार ताम्हाणे, मंगेश खंडागळे, दिपक गुप्ता, ओम क्षीरसागर, विजय दळवी, यांच्यासह अनेक महिला व पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते.