अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी सोडली ट्रम्प प्रशासन साथ

0
14

दि . २९ ( पीसीबी ) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासन सोडल्याची मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडियावर मस्क यांनी यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे.

ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मस्क यांची अमेरिकन सरकारमध्ये विशेष सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली होती. सरकारी खर्च कमी करण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर दिली होती. दरम्यान, त्यांचा ट्विटरवर पोस्ट करत मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडल्याची घोषणा केलीय.

काय म्हटलं आहे म्सक यांनी ट्विटमध्ये?
अमेरिकन सरकारमधील विशेष कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपत आला आहे. सरकारचा अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो. DOGE चे ध्येय काळानुसार अधिक मजबूत होईल. असं मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.