अबब…महापालिका उपायुक्तांकडे कोटी रुपयांची अवैध संपत्ती

0
260

पुणे, दि. ६ (पीसीबी) – पुणे महापालिकेच्या एका उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर अवैधरित्या सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती जमविल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित उपायुक्तांच्या घराची सकाळपासून झाडाझडती सुरू आहे. गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव विजय भास्कर लांडगे (वय- ४९ वर्ष) आहे. लांडगे हे पुणे महापालिकेत आकाशचिन्ह विभागात उप आयुक्त पदावर कार्यरत होते. विजय लांडगे यांच्यासह त्यांच्या पत्नी शुभेच्छा विजय लांडगे (वय-४३ ) यांचीही दिवसभर एसीबीकडून चौकशी झाली आहे.

महापालिकेत अभियंता म्हणून रुजू झालेले विजय लांडगे 2008 च्या काळात क्षेत्रिय कार्यालय उपायुक्त म्हणून कार्यरत झाले. घोले रोड, येरवडा क्षेत्रिय कार्यालय आदि ठिकाणी क्षेत्रिय अधिकारी (उपायुक्त) म्हणून काम केले. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभाग प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती. सध्या ते पालिकेच्या तांत्रिक विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.