अपहरण करुन खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

0
383

पुणे, दि. १ (पीसीबी) – अपहरण करुन खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून एक लोखंडी कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई येरवडा येथील खाऊ गल्ली येथे 29 जून रोजी रात्री केली.

निलेश अरुण कोंढवळे (वय-27 रा. पारनेर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलादार स्वप्नील मराठे यांना माहिती मिळाली की, खाऊ गल्ली येथे दोन जण दुचाकीवर थांबले असून दुचाकीला नंबर प्लेट नाही. तसेच त्यांची हालचाल संशयास्पद आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी खाऊ गल्ली येथे सापळा रचला. त्यावेळी पोलीस आल्याचे समजताच आरोपीला पळून जात असताना ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ लोखंडी कोयता मिळाला.

आरोपीला येरवडा पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता 28 जून रोजी रात्री 11 च्या सुमारास पिंपरी येथून वाघोलीच्या दिशेने जाणाऱ्या एकावर कट करुन कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत समोर आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) आयपीसी 341, 120(ब), 507, 506, 34 नुसार गुन्हा दाखल आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार , सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम , पोलीस निरीक्षक गुन्हे जयदिप गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे , पोलीस अंमलदार गणपत थोकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, अश्विन देठे, सुशांत भोसले, स्वप्निल मराठा, मोहन गिरमे, प्रविण माळे, तेजस पवार, अनिल अहिवळे यांच्या पथकाने केली.