अपघातात रिक्षा चालकाचा मृत्‍यू

0
96

चाकण, दि. २० (पीसीबी) : भरधाव वेगातील रिक्षा दुभाजकाला धडकून झालेल्‍या अपघातात चालकाचा मृत्‍यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १९) मध्‍यरात्री पावणे बारा वाजताच्‍या सुमारास घडली.

शंकर पांडूरंग हागवणे (वय ५०, रा. रानमळा कडूस, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्‍यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी रुग्‍णवाहिका चालक साईनाथे माधव माकणे (वय १९, रा. यशवंतनगर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी शंकर हागवणे हा रिक्षा चालक चाकणकडून खेडच्‍या दिशेने चालला होता. गुरुवारी मध्‍यरात्री पावणे बारा वाजताच्‍या सुमारास त्‍याची रिक्षा दुभाजकाला धडकून विरूद्ध दिशेच्‍या रस्‍त्‍यावर पलटी झाली. या अपघातात रिक्षा चालक शंकर हागवणे याचा मृत्‍यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.