अपघाताचे प्रकरण मिटविल्याने टोळक्याकडून जीवे मारण्याची धमकी

0
151

दि २८ एप्रिल (पीसीबी ) – अपघाताचे प्रकरण मिटविल्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एकाला मारहाण करत तिघांना जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 24 एप्रिल रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास मेदनकरवाडी चाकण येथे घडली.

संकेत मांगलेकर (वय 24), सौरभ मांगलेकर (वय 26), तुषार सोनटक्के (वय 28), शंकर यादव (वय 37), वंश मंदावले (वय 20, सर्व रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मारुती दत्ताराम पांढरे (वय 35, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपी हे मारुती पांढरे यांच्या घरात घुसले. पांढरे आणि त्यांचा मित्र किशोर चव्हाण यांनी भीम जाधव यांचे अपघाताचे प्रकरण कमी पैशांमध्ये मिटवले. या रागातून आरोपींनी पांढरे यांचा भाचा हनुमंत मोरे याला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर पांढरे यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. तसेच पांढरे यांचे मित्र किशोर चव्हाण यांच्या घराकडे जाऊन त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.