मुंबई, दि. १ (पीसीबी) महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक सामान्य लोकांना आपलं आयुष्य जगावं वाटत असतं. पुणे हे विद्येचे माहेरघर असलं तरी मात्र, मुंबईला सिटी ऑफ ड्रीम्स म्हटलं जातं. दरम्यान, मुंबईतूून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
गेले काही दिवस आपण ऐकत होतो की, मुंबईच्या प्रदुणाषामुळे अनेकजणांच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. दिल्लीनंतर मुंबईच्या प्रदुषणात वाढ झाल्याचं पहायाला मिळाला. त्यामुळे मुंबईमधील काही बांधकामांवर देखील थोडेदिवस बंदी घालण्यात आली होती. मात्र, रोजच्या वाढत्या प्रदुषणामुळे काही नागरिक शहर सोडून जाण्याचा विचार करत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईमध्ये वाढत्या प्रदुषणामुळे काहींना आरोग्याच्या समस्या जाणू लागल्या आहेत. जसं की, अस्थमा, श्वास घेण्यास त्रास होणे, किंवा जीव घाबरणे. त्यामुळे मुंबईतील 60% नागरिकांनी शहरापासून दूर स्थलांतर होण्याचा विचार केला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनूसार आरोग्यविषयक सेवा पुरवठा कंपनी प्रिस्टिन केअरने मुंबई आणि दिल्लीतील 4 हजार लोकांशी चर्चा केली. दरम्यान चर्चेनंतर ही धक्कादायक माहिती समोर आली.
मुंबई सोडण्यामागचा विचार?
चर्चा करत असताना येथील नागरिकांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी 10 पैकी 9 लोकांनी श्वास घेण्याचा त्रास होत असल्याचं सांगितलं तर, हिवाळ्यामध्ये दम्याचा पूर्वीपेक्षा जास्त त्रास वाढल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. याच बरोबर काही जणांच्या जीवनशैलीत बद्द्ल झाल्याचं सांगितलं आहे.
मुंबईमध्ये अनेक नागरिक मरीन ड्राईव्हला माॅर्निग वाॅकला जात होते. मात्र, आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे काहीजणांनी माॅर्निंग वाॅकला जाणं बंद केलं आहे. एकूण 35 % लोकांनी माॅर्निंग वाॅकला किंवा व्यायाम करायला जाणं बंद केलं आहे. तर 35% नागरिक मास्क वापरत असल्याचं सांगण्यात आलं आहे.