अनिष्ठ रूढींना आळा घालण्याचे मोठे कार्य संत गाडगे बाबांनी केले

0
189

पिंपरी, दि. २० (पीसीबी)- संत गाडगेबाबा हे भजन किर्तनाच्या माध्यमातून आणि त्याच्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठी काम करणारे थोर समाजसुधारक होते. त्यांनी अज्ञान, अस्वच्छता आणि अनिष्ठ रूढींना आळा घालण्यासाठी केलेले कार्य महत्वपुर्ण आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य बन्सी पारडे, सामाजिक कार्यकर्ते नरेश कदम, विशाल जाधव, पांडुरंग परचंडराव, गजानन गवळी, संतोष भालेकर, सुनिल अभंग, संतोष जोगदंड, अरूण तळेकर, रामेश्वर गायकवाड, कुमार दळवी, किरण लोंढे, प्रशांत दळवी, युवराज दाखले, समीर शिंदे, किशोर रोकडे, राजाभाऊ दळवी, निखील दळवी, संतोष माळी, संतोष गोतावळे, किरण लोखंडे, सुनील पवार, बाळू वाघ, नवनाथ वाघ, कल्पना गायकवाड, वैशाली राऊत, सुमन अभंग आदी उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यात जन्म झालेल्या संत गाडगेबाबा यांनी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. लोकांनी दिलेल्या देणगीतून त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, नद्यांचे घाट बांधले तसेच विद्यालये सुरू केली आणि लोकसेवेचे व्रत आयुष्यभर जपले. त्यांच्या नावाने सर्वत्र स्वच्छता अभियान देखील राबविले जाते.