अनिता नानासाहेब शितोळे यांचे निधन

0
76

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) : दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या पत्नी श्रीमती अनिता शितोळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सूना,नातवंडं असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता राहत्या घरापासून निघेल.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, उद्योजक अजय शितोळे आणि अरविंद एज्युकेशन ट्रस्ट संचालिका आरती राव यांच्या त्या मातोश्री होत.